भाडेकरूंना दिलासा…गृहनिर्माण विभागाचा आदेश

14

कोरोना Covid19 या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्णदेशात लॉकडाऊन आहे, अनेक उद्योग- धंदे, बाजारपेठा, कारखाने बंद आहेत आणि त्यामुळे आर्थिक व्यवहार हि ठप्प आहेत. यासर्व गोष्टींच्या परिणामामुळे राज्यातील लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे. या कारणामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

राज्यातील भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये भाडेकरूंना भाडे भरणे शक्य नाही, त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागामार्फत एक महत्वपूर्ण अध्यादेश आज काढण्यात आला आहे, ज्यामध्ये घर मालकांनी भाडे वसुली पुढील ३ महिने पुढे ढकलावी आणि भाडे न दिल्यामुळे कोणालाही घर सोडायला लावू नये अशी सूचना राज्यातील सर्व घर मालकांना करण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सर्व भाडेकरूंना दिलासा मिळणार आहे.