मुख्यमंत्र्यांना कणा आहे का? नितेश राणेंचा खोचक टोला

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलानात सहभाग घेतला. महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी हे एकटे नाहीत हे सांगण्यासाठी आलोयं, भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे, असं नितेश राणे म्हणाले. सदाभाऊ खोत यांना फार मच्छर चावतात असा इंटरव्यू चालवला.
सदाभाऊ खोतांना मला सांगायचंय दोन तीन मच्छर बाटलीत भरुन द्या, अनिल परब यांच्या घरी ते सोडायचे आहेत. जेणेकरुन मच्छर कसे चावतात हे त्या कारट्याला कळेल, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. तो मूळ तसा आमच्या सिंधुदुर्गचा आहे, माझ्या मतदारसंघाचा आहे, पण आमच्या मातीतून असा कारटा कसा निघाला हा संशोधनाचा विषय आहे,असं नितेश राणे म्हणाले.
आपण जे आंदोलन करत आहात मला आश्चर्य वाटत, मुख्यमंत्र्याच्या मानेची शस्त्रक्रिया झाली. ते बरे असल्याची माहिती आहे. आमच्याही शुभेच्छा आहे. मात्र, डॉक्टरांनी एक संशोधन केलंय नेमक या माणसाला कणा आहे का पाहायला पाहिजे. कणा असलेला माणूस सामान्य माणसासोबत असं वर्तन करणार नाही. तुम्हाला एवढे दिवस इथं बसवलं आहे. एक तरी आमदार, पालकमंत्री, मंत्री,मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी इथं येत नाही.
शाहरुखचा मुलगा जेलमध्ये होता त्यावेळी त्यांना झोप येत नव्हती. आमच्या राष्ट्रवादीच्या ताई आहेत, त्या ताई म्हणाल्या आर्यन खान जेलमध्ये असल्यानं त्याच्या आईला काय वेदना होत असतील ते आई म्हणून कळतंय. ताई असंख्य महिला इथं बसल्यात त्यांच्या आईला काय वाटत असेल याचा ताईला वाईट वाटत नाही. हे गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत.