विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि पालकांचा विश्वास हेच शुल्क नियमन व्यवस्थेचे केंद्रबिंदू – मंत्री चंद्रकांत पाटील

6

मुंबई : मंत्रालयात शुल्क नियामक प्राधिकरण (FRA) संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठक घेऊन प्राधिकरणाच्या कामकाजासह शुल्क निश्चिती प्रक्रिया आणि संबंधित विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला.

विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक शुल्काबाबत पारदर्शक आणि अचूक माहिती मिळावी, तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये शुल्क निश्चितीची प्रक्रिया नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि पालकांचा विश्वास हेच शुल्क नियमन व्यवस्थेचे केंद्रबिंदू असले पाहिजेत, या दृष्टीने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

या बैठकीस विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, DBATU चे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, शुल्क नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष शेखर चन्ने तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.