पात्र असलेल्या प्रत्येक पदवीधर व शिक्षकाने मतदार म्हणून नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर बुधवारी सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. यावेळी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे महत्त्व, मतदार नोंदणी अभियान तसेच विशेष सघन मतदार पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रियेबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.
यावेळी पाटील म्हणाले, पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे आवाज मिळावा, त्यांच्या समस्या सक्षमपणे मांडल्या जाव्यात आणि त्यांचे निराकरण व्हावे, यासाठी या दोन्ही मतदारसंघांना स्वतंत्र प्रतिनिधित्व आहे. त्यामुळे पात्र असलेल्या प्रत्येक पदवीधर व शिक्षकाने मतदार म्हणून नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
तसेच, निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या विशेष सघन मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानात प्रत्येकाने सहकार्य करून आवश्यक माहिती संबंधित अधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपा पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे सहप्रमुख शेखर इनामदार, शरद लाड, विलास काळेबाग, राहुल महाडिक, एकनाथतात्या जाधव, संस्थेचे सचिव चिमणभाऊ डांगे, सहसचिव विश्वनाथबापू डांगे तसेच संस्थेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.