संकटाच्या काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

14

सांगली, ०९ नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या.

यावेळी पाटील म्हणाले, संकटाच्या काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांवर अग्रीम मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलावा, त्यांच्या आयुष्यात समृद्धी यावी, यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यांच्या प्रत्येक अडचणीत सरकार त्यांच्या सोबत आहे, हा विश्वास यानिमित्ताने मंत्री पाटील यांनी दिला.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.