ऐनवडे येथील विशेष कार्यकारी अधिकारी दाजी पवार यांचे निधन; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कुटुंबीयांना २ लाखांची मदत
सांगली : खानापूर तालुक्यातील मौजे ऐनवडे येथील विशेष कार्यकारी अधिकारी दाजी पवार यांच्या आकस्मिक निधनाबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पवार कुटुंबीयांवर ओढवलेल्या या कठीण प्रसंगी त्यांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने पालकमंत्र्यांच्या हस्ते दोन लाख रुपयांचा मदतीचा धनादेश पवार यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.
“समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. या कठीण प्रसंगी आम्ही पवार कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” अशा भावना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच, ईश्वर दिवंगत दाजी पवार यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक, सरचिटणीस विलास काळेबाग, तालुकाध्यक्ष दाजी पवार, पालकमंत्री कार्यालयाचे ओएसडी बाळासाहेब यादव, दीपक बाबा शिंदे, मकरंद देशपांडे, शरद लाड, विश्वनाथ डांगे, पांडुरंग कोरे, डॉ. साठे, केदार खाडिलकर यांच्यासह इतर मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.