नागरिकांचा विश्वास संपादन करून घरपट्टीच्या प्रश्नावर पारदर्शकपणे कार्यवाही करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

1

सांगली : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणीबाबत गुरुवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर आढावा बैठक घेतली.

नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती, तक्रारी व सूचनांचा वस्तुनिष्ठपणे विचार करून, नागरिकांना दिलासा मिळेल आणि महापालिकेला आवश्यक निधी उपलब्ध होईल, अशा समतोल भूमिकेतून निर्णय घेण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी संबंधित समितीला दिल्या.

पाटील म्हणाले, नागरिकांचा विश्वास संपादन करून घरपट्टीच्या प्रश्नावर पारदर्शकपणे कार्यवाही करावी. महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने नागरिकांच्या अडचणींचा अभ्यास करून योग्य शिफारसी सर्वसाधारण सभेसमोर मांडाव्यात, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महापालिका आयुक्त संजीता महापात्र, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती अतुल माने, उपायुक्त राहुल रोकडे, माझे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, गटनेते संदीप आवटी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.