बाळापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसंग्रामचाच दावा

2

अकोला :

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघावर भाजप -सेना युतीत शिवसंग्रामचाच दावा असून शिवसंग्राम तर्फे शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांना विधानसभेवर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठविणार असल्याचे शिवसंग्राम चे अकोला जिल्हा निरीक्षक शैलेश सरकटे यांनी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद अकोला जिल्ह्याचे सदस्य नोंदणी अभियान रविवार 7 जुलै,, रोजी बाळापूर येथे उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले केले प्रारंभ होत आहे

शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियान प्रसंगी शिवसंग्राम चे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघातून वीस हजार सदस्य नोंदणी करणार असल्याचे प्रतिपादन केले. पुढे बोलताना शैलेश सरकटे म्हणाले की, ‘संपूर्ण महाराष्ट्रासह अकोला जिल्ह्याच्या समाजकारणात व राजकारणात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या शेतकरी, गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक व सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाय्रा शिवसंग्राम द्वारा स्थापित करण्यात आलेल्या भारतीय संग्राम परिषदेने महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय व महत्वपूर्ण भूमिका पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार विनायकराव मेटे यांच्या कुशल नेतृत्वात व मार्गदर्शनात भारतीय संग्राम परिषदेचा राज्यभरात मोठ्या झपाट्याने विस्तार होत आहे. अकोला जिल्ह्यातही भारतीय संग्राम परिषदेचे संघटन मजबूत केल्या जात आहे. शिवसंग्राम च्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवण्यात येणार आहे. गोरगरीब जनता व शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी व बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी शिवसंग्राम प्रयत्न करेल यावेळी शिवसंग्राम चे गोपाल भगत विजू पाटील वाघ जीवन कोकाटे ज्ञानू शेळके सुमित घाटोळ शिवसंग्राम युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय पाटील झटाले शुभम ढोरे धनंजय माळी विठ्ठल नळकांडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे चे संचालन जगदीश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल पाटील ठाकरे यांनी केले आहे.