भरत गोगावले यांची विजयाची तर माणिक जगताप यांची पराभवाची हॅट्रिक 

10

महाड विधानसभेचा गड  राखण्यात शिवसेनेला पुन्हा यश आले असून, शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी तब्बल २२ हजारांचे मताधिक्क्य घेऊन काँग्रेसचे माणिकराव जगताप यांच्यावर विजय संपादित केला. भरत गोगावले यांना १ लाख २ हजार २७३ मते  तर माणिक जगताप यांना ८० हजार ६९८  मते मिळाली. 

महाड विधानसभेची निवडणूक हि गेली अनेक वर्षांपासून भरत गोगावले विरुद्ध माणिकराव जगताप अशी होत असते. महाड माणगाव पोलादपूर या तीन तालुक्यांचा या मतदारसंघात समावेश होते.  शिवसेनेचे ग्रामीण भागात वर्चस्व असून महाड नगर[परिषद काँग्रेसच्या ताब्यात आहे. पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून भरत गोगावले यांनी महाड विधानसभेवरील आपली पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले आहे. 
निकालानंतर विजयी मिरवणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह यावेळी पाहायला मिळाला.  शिवसेना, युवासेना आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह महिलांचा मोठा सहभाग यावेळी पाहायला मिळाला.