विनायक मेटे नवनिर्वाचित आमदारांसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

महायुतीमधील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत महायुतीअंतर्गत शिवसंग्रामचे आ भीमराव केराम यांनी निवडून आल्याबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, अशोकराव सूर्यवंशी, धर्मसिंह राठोड, शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे, बाजीराव चव्हाण, बाळा पालकर आदींसह पदाधिकारी उपस्थिती होते. याआधी वर्सोव्याच्या नवनिर्वाचित आमदार भारती लव्हेकर यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामला वर्सोवा, किनवट आणि चिखली या तीन जागा देण्यात आल्या होत्या आणि तीनही जागा निवडून आणण्यात मेटे यांना यश आले आहे, आणि बीड विधानसभेची जागा न मिळाल्यामुळे नाराज असलेले मेटे यांनी महायुतीचेच काम करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आणि बंडखोरी करणे देखील टाळले होते. त्यामुळे अगोदर पासूनच मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील असलेले आमदार मेटे यांचे राजकीय वजन वाढले आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा समावेश होणार अशी हि चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे.