‘अभिजीत बिचुकले’ करणार सत्ता स्थापनेचा दावा

मराठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी एका पत्रकाद्वारे आपण सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे. त्यासोबतच मला मुख्यमंत्री होण्याकरिता आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा असे देखील त्यांनी पत्रकामध्ये म्हंटले आहे. लवकरच यासंदर्भात अभिजीत बिचुकले हे राज्यपाल महोदय यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
