पर्यटकांना माथेरान पर्यटनस्थळावर 3 मे पर्यंत बंदी – जिल्हाधिकारी

1

अलिबाग, जि. रायगड, दि.15 : शासनाने करोना विषाणूचा (COVID-19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 लागू केला आहे. 
जिल्ह्यातील माथेरान येथील पर्यटनस्थळावर मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यटनासाठी येत असल्याने ही नागरिकांची होणारी गर्दी टाळून विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून साथरोग अधिनियम 1897 व महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 2020 नुसार या पर्यटनस्थळावर जाण्यासाठी सर्व पर्यटकांना दि.31 मार्च 2020 पर्यंत बंदी घालण्यात आली होती. मात्र आता लॉकडाऊनचा कालावधी दि.3 मे पर्यंत वाढविण्यात आल्याने माथेरान पर्यटनस्थळावर जाण्यासाठी सर्व पर्यटकांना दि. 03 मे 2020 पर्यंत बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिले आहेत.


या आदेशानुसार कार्यवाही न करणाऱ्या व्यक्ती,नागरिक वा आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्ती,नागरिक यांच्याविरुध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे.