भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘नीलेश राणे’ यांना जवाबदारी

25

ग्रामपंचायत निवडणुकीत नारायण राणे कुटुंबाने मोठी ताकद लावून सिंधुदुर्गात भाजपला मोठा विजय मिळवून दिला आहे. सिंधुदुर्गात शिवसेनेवर मात केल्यानंतर लगेच निलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ‘सचिव’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई येथे मा. मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, खासदार नारायण राणे आणि आमदार रविंद्र चव्हाण, राजन तेली यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी नीलेश राणे यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.