‘दहा’ माणिक जगताप आले तरी हरवू शकत नाही – भरतशेठ गोगावले 

12

महाड – महाड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार भरतशेठ गोगावले यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रतिस्पर्धी माणिक जगपात यांचा चांगलाच समाचार घेतला. 
विकास कामे केली नाहीत म्हणूनच महाडच्या जनतेने यांना घरी बसावले, लोकांना हायफाय नेता नको तर जनसामान्यांमध्ये मिसळणारा सेवक हवाय असे ते म्हणाले. त्यामुळे असे दहा माणिक जगताप जरी आले तरी हरवू शकत नाही असे म्हणत भरतशेठ गोगावले यांनी माणिक जगताप यांचा समाचार घेतला. 


विकासकामांची माहिती देताना त्यांनी भागात केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवला. शिवसेनेमध्ये आज सर्व जाती, धर्म, समाजाचे लोक प्रवेश करत आहेत आणि त्यांना सोबत घेऊनच पुढील वाटचाल करणार असल्याचे भरतशेठ गोगावले यांनी सांगितले.  अब कि बार तीस हजार पार हाच नारा असून, ती मताधिक्याची संख्या दिवसेंदिवस होणाऱ्या शिवसेना प्रवेशांमुळे वाढेलच असा विश्वास हि त्यांनी यावेळी व्यक्त केला.