भाऊबीजची एकच भेट, नामदार आमचे भरत शेठ

2 601

रायगड जिल्ह्यातील महाड मतदार संघातील प्रचारामध्ये  शिवसेनेच्या महिला पदाधिकारी यांनी आघाडी घेत, मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. शिवसेनेच्या माजी रा.जि.सदस्य सुषमा भरतशेठ गोगावले यांनी महिला, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आसनपोई येथे महिला मेळावा घेत आमदार भरतशेठ गोगावले यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून आणण्याचा निर्धार केला. यावेळी त्यांच्या समवेत कोमल ताई गोगावले – मोरे, सपनाताई मालुसरे ,सिद्धीताई खांबे , ममताताई गांगण ,दीपिका ताई शेलार या प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होते. 


उपस्थित महिलांनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमच्यासाठी यंदा दसरा -दिवाळी आणि भाऊबीजची एकच भेट, नामदार आमचे भरत शेठ ..म्हणत मताधिक्याची हमी दिली. 

Get real time updates directly on you device, subscribe now.