कर्तव्यनिष्ठ व दानशूर अधिकार्यांनी स्वच्छ पुरस्काराची संपूर्ण रक्कम ‘#Covid_19 ‘च्या फंडात केली जमा
स्वच्छ पुरस्कार २०१९-२०२० अंतर्गत प्रमुख आरोग्य निरीक्षक संवर्गात प्रथम क्रमांक मिळविणारे शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाकडील प्रमुख आरोग्य निरीक्षक श्री. इमामुद्दीन सिराजउद्दीन इनामदार, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक संवर्गात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवणारे नगररोड क्षेत्रिय कार्यालयाकडील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. अनिल डोळे, आरोग्य निरीक्षक संवर्गात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविणारे नगररोड क्षेत्रिय कार्यालयाकडील आरोग्य निरीक्षक श्री. मुकुंद घम आणि मोकादम संवर्गात द्वितीय क्रमांक मिळविणारे नगररोड क्षेत्रिय कार्यालयाकडील मोकादम श्री. गणेश रणवरे त्यांना स्वच्छ पुरस्कार 2019-20 अंतर्गत पुरस्कारार्थ प्राप्त झालेली संपूर्ण रक्कम आज दिनांक २०/४/२०२० रोजी मा. महापालिका आयुक्त कोविड 19 यांचे फंडामध्ये सुपूर्द केली.
श्री. इनामदार यांनी पुरस्काराची रक्कम रु. २१,०००/- तर श्री. डोळे, घम व रणवरे यांनी प्रत्येकी ७,०००/- पुरस्काराची रक्कम, असे एकूण रक्कम रु. ४२,०००/- मा. महापालिका आयुक्त कोविड 19 साठीच्या फंडामध्ये सुपूर्द करण्यात आली. यावेळी श्री.ज्ञानेश्वर मोळक, सह महापालिका आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग हे देखील उपस्थित होते.
यावेळी मा. महापालिका आयुक्त यांनी सर्वांचे आभार मानून करोना रोगाच्या या कालावधीत पुणे महानगरपालिकेकडील अधिकारी/कर्मचारी, सर्व अत्यावश्यक सेवा खात्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, तसेच नागरिकांचे सोयीसाठी सर्व अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देणारे सामाजिक घटक यांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून समाजातील सर्व सबळ आर्थिक घटकांनी पुढे येऊन सढळ हाताने आर्थिक, व अन्य शक्य त्या सर्व प्रकारे आपापला सक्रिय सहभाग द्यावा असे आवाहन या वेळी महापालिका आयुक्त श्री. शेखर गायकवाड यांनी केले.