व्हिडीओ : अवघ्या 1400 रुपयांत व्हेंटिलेटर, जामखेडच्या इंजिनिअरिंग विधार्थ्याचे इनोव्हेशन

जिद्द, धडपड व बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना कशाचाही अडसर येत नाही. असाच माझ्या मतदारसंघातील जामखेडच्या सोहेल सय्यद या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांने अवघे 1400 ₹ खर्च करुन टाकाऊ वस्तूपासून हा व्हेंटिलेटर बनवलाय. तो कसा आहे ते तुम्हीही या व्हिडिओत पहाच या शब्दात आमदार रोहित पवार यांनी सोहेलचे कौतुक फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केले.