लॉकडाऊन मध्ये चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांचे ‘ऍग्रो टुरिझम’

14

चिखलीच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी आज लॉकडाऊन मध्ये ऍग्रो टुरिझमचा आनंद घेतला. आमदार श्वेता महाले यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवर शेतातील काही फोटो शेअर केले ज्यामध्ये सकाळी परिवारातील एका सदस्याच्या शेतात जाऊन तेथील काही महिलांसोबत घरच्यासाठी भाजी काढण्याचा आणि खुरपण्याचा आनंद घेतल्याचे म्हंटले आहे.

संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहे, त्याच बरोबर बुलढाणा जिल्हातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते सर्वांना घरात राहण्याचे आवाहन करत, संपूर्ण शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था मदत कार्यात आहेत दुसरीकडे सोशल मिडीयावरील असे फोटो नक्की काय संदेश जनतेपर्यंत पोहोचवत असतील याच भान देखील जवाबदार लोकप्रतिनिधी यांनी ठेवायला हवे..

MLA Shweta Mahale – Patil