सलाम..! संवेदनशील, निखील आणि धैर्यशीलला

249

पहिला वाढदिवस म्हंटल कि समोर येत ते सेलीब्रेशन, मौज, मज्जा आणि खूप सारे गिफ्ट्स. आपल्या मुला-मुलीचा पहिला वाढदिवस चांगल्या थाटा-माटात साजरा करणे हि सगळ्या आई-वडिलांची इच्छा असते, का नसावी त्यांच्या काळजाच्या तुकड्याच्या तो पहिला वाढदिवस असतो.

पुण्यातील देवांश नावाच्या मुलाचा आज पहिला वाढदिवस, वडील जर्मनीत लॉकडाऊनमध्ये अडकलेले आणि कोरोनाने सेलिब्रेशनच प्लानिंग फेल केल होत, हा बिर्थ डे स्पेशल कसा होणार हा विचार देवांशचे बाबा करत होते त्यांनी मित्रांना सांगून मराठी कलाकार शुभेच्छा देतील का व्हिडीओ रुपात अशी विचारणा त्याक्षेत्राशी निगडीत मित्राकडे केली. मित्राने बोलून कळवतो सांगून, अभिनेता धैर्यशील घोलप आणि निखील चव्हाण यांच्याशी निकटवर्ती द्वारे संपर्क साधला आणि दोघांनी लगेच आपले शुभेच्छा देणारे व्हिडीओ पाठवले आणि आज त्यामुळे देवांशचा वाढदिवस स्पेशल झाला आहे..

दोन्ही कलाकार मातीशी जोडलेले, जमिनीवर असणारे फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा न पाहता त्यांनी त्या मुलाच्या वडिलांच्या भावनांचा विचार केला आणि तो शुभेच्छा व्हिडीओ पाठवला..खरच युवा कलाकारांच्या या कृतीने आज वेगळ समाधान लाभल. माणूस किती मोठा झाला तरी त्यातील माणुसकी आणि संवेदनशील पणा कमी नाही झाला पाहिजे हे या दोघांनी कृती मधुन दाखवल..म्हणूनच सलाम..! संवेदनशील निखील आणि धैर्यशीलला.