लेखक, दिग्दर्शक अमोल भावेंचे, वास्तवाची जाण करून देणारे भावनिक आवाहन..

189

मी लेखक , दिग्दर्शक, अमोल अरविंद भावे ही पोस्ट चित्रपट महामंडळ अध्यक्ष , माननीय मुख्यमंत्री , महाराष्ट्रातील आमदार , खासदार , नगरसेवक आणि केवळ नाट्यपरिषदे साठी निधी मिळावा म्हणून आवाहन करणाऱ्या सेलिब्रिटी कलाकार मित्रानं साठी आहे . लॉकडाऊन चा पिरेड वाढतच चालला आहे पुढे परिस्थिती खूप गंभीर होणार आहे . लॉकडाऊनच्या पिरेड मध्ये लोकांचा सर्वात जास्त टाईमपास करत आहे ते आमचं मनोरंजन क्षेत्र आणि आज या जागतिक संकटाचा सर्वात जास्त वाईट परिणाम भोगावा लागत आहे, तो आमच्या क्षेत्रातील लोकांना कारण आमचं उत्पन्न अस्थीर असत, उच्च पदावर काम करणाऱ्या लोकांना बरे पैसे मिळतात पण ते ही तीन महिन्याच्या क्रेडिट नंतर तर स्पॉटबॉय , हेल्पर , या लोकांना रोज पगार दिला जातो तो एवढा कमी असतो की उदया शूटिंग नसेल तर पर्वा चूल घरची चूल कशी पेटेल ? हाप्रश्न त्यांच्या पुढे असतो. त्या मुळे कोणाचच भविष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी सेव्हिंग होत नाही . तरी हे सगळे काम करत असतात ते फक्त कलेच्या आवडी पोटी, म्हणून या क्षेत्रात काम करणाऱ्याना एक टोपण नाव आहे ते म्हणजे ” येडा ” पण आम्हाला येडा असल्याचा अभिमान आहे कारण आज याच येड्यांन मुळे लॉकडाऊन मुळे घरी बसलेल्या जगातील सर्व लोकांचा वेळ कधी हसत कधी भावनिक होत कधी रडत कधी रेसिपी बनवत जात आहे . हेच कलाकार , तंत्रज्ञ , कामगार मात्र या लॉकडाऊन पिरेड मध्ये फक्त रडत आहेत आणि ही आमची मंडळी पडदयावर , पडदया मागे न लाजता काम करत असले तरी मूळ आयुष्यात मात्र कोण कडे मदत मागायला मात्र खूप लाजतात. त्यामुळे गणपत पाटील , भगवान दादा , सखाराम भावे अशी कितीतरी उदाहरण आहेत ज्यांच्या कडे वृद्धापकाळात स्वतःवर उपचार करायला ही जवळ शिल्लक न्हवती .

जेव्हा चित्रपट महामंडळ , नाट्य परिषद , विधानसभा , लोकसभा , ग्रामपंचायत यांच्या निवडणूका होतात तेव्हा आपल्या प्रतिनिधीला निवडून देण्यात या येड्यांच सुद्धा मत असत ते ही कुठलही आमिष न घेता . त्या वेळी मत मिळवण्यासाठी प्रत्येक प्रतिनिधी हया मतदारा पर्यन्त बरोबर पोचतो मग जेव्हा त्यांच्यावर अस संकट येत तेव्हा का नाही पोचू शकत ? करायचं ठरवलं तर सर्व शक्य आहे आज माझ्या एकट्याची ताकत नसून मी बदलापूर च्या सर्व कलाकार , कामगार , लोककलावंत , तंत्रज्ञ यांना होईल तेवढी धान्य वाटपाची मदत करत आहे आणि म्हणूनच ही पोस्ट लिहायचं धाडस केल आहे .

मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष साहेब आपण मदतीसाठी प्रयत्न करत आहात हे माहिती आहे पण आता 40 दिवस होऊन गेले तरी आपली मदत सभासदांना पोचली नाही माणूस मेल्या नंतर पाणी पाजून काही फायदा नाही . आपण अपयशी तेव्हाच होतो जेव्हा आपली मेहनत कमी पडते सर मला माहिती आहे नुकतीच आपण महामंडळाची कार्यालये खरेदी केली आहेत त्या मुळे आपल्या कडे फंड नाही पण आपले कितीतरी मोठे सेलेब्रिटी आर्टिस्ट अभासद आहेत ज्यांनी लोकांना आवाहन केलं मदतीच तरी त्यांचे फॅनफॉलर हसत हसत त्यांना शक्य होईल तेवढी मदत महामंडळा कडे पाठवतील . असे व्हिडीओ नाट्य परिषदे साठी निधी जमा व्हावा म्हणून कितीतरी कलाकार बनवत आहेत आणि त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय .नाट्य परिषदेच्या प्रत्येक कलाकार , तंत्रज्ञांना परिषदे कडून धान्याची व आर्थिक मदत योग्य वेळी पोचली आहे त्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे, फक्त त्यांना एकच विनंती आहे की कलाकार , तंत्रज्ञ हे सगळे सारखच काम करतात फक्त त्यांच्या संस्था वेगवेगळ्या आहेत पण अशा परिस्तिथीत हे वर्गीकरण न करता चित्रपट आणी नाट्य या दोन्ही संस्थांनी एकमेकांना मदतीचा हात देत प्रत्येक कलाकार , तंत्रज्ञ , कामगार यांना मदत केली पाहिजे .

माननीय मुख्यमंत्री साहेब तुमच्या पाठीवर पूर्ण महाराष्ट्रच ओझ आहे आणी ते तुम्ही लीलया पेलत आहात यात शंका नाही त्या बद्दल तुम्हाला मानाचा मुजरा पण तुम्हाला एकच विनंती आहे तुम्ही एकदा महाराष्ट्रातील खासदार , आमदार , नगरसेवक , सरपंच यांना त्यांच्या विभागातील फक्त कलाकार , तंत्रज्ञ , कामगार यांच्या मदती साठी आवाहन करा निवणुकीच्या वेळी प्रत्येक मतदारा पर्यन्त पोचता तस आमच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती पर्यन्त पोचायला सांगा आणि त्या साठी प्रत्येकाच्या घरी जायची सुद्धा गरज नाही आज आपण ऑनलाइन सुद्धा हे काम करू शकतो माझ्या सारख्या सामान्य लेखक , दिग्दर्शकाची एवढी विनंती मनावर घ्या,  काही जास्त बोलून गेलो असेल तर कृपया माफ करा हे लिहिलंय ते केवळ माझ्या या ” येड्या ” मित्रांच्या प्रेमापोटी .

आपले सर्व रसिक प्रेक्षक आमच्यावर खूप प्रेम करतात त्यांना जरी साहेब तुम्ही एक आवाहन केलं तरी लॉकडाऊन संपेपर्यंत या महाराष्ट्रातील कलाकारांच्या चुली पेटत राहतील एवढी मदत आपल्या कडे जमा होईल . माझ्या सारखा सामान्य लेखक , दिग्दर्शक बदलापूरच्या नागरिकांना आवाहन करून त्याला नागरिक इतका छान प्रतिसाद देत आहेत आज ते करत असलेल्या मदतीतून बदलापूर च्या सर्व कलाकार , तंत्रज्ञ , कामगार , लोककलावंत यांच्या प्रयन्त मी मदत पोचवतो आहे तर विचार करा तुम्ही अस एक आवाहन फक्त आमच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांन साठी केलं तर काय होईल . महाराष्ट्रातला एकही कलाकार , तंत्रज्ञ , कामगार या लॉकडाऊन च्या काळात उपाशी राहणार नाही . तेव्हा पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की एक हात मदतीचा आमच्या सारख्यान साठी ही पुढे करा आपला – अमोल अरविंद भावे .

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!