आदित्य ठाकरेंवर, मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांची खोचक टिका म्हणाले…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी अतिशय खोचक शब्दात युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आणि वरळी मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वर टीका केली आहे..
आयत्या मतदारसंघात आमदार बनणं, वडिलांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री बनणं जितकं सोपं आहे, तितकं करोनाला हरवणं सोपं नाही. सत्तेमुळे दुसऱ्याचं श्रेय लाटून प्रसिद्धी मिळवणं मात्र सर्वात सोपं! वरळीकरांनी #MahaPappuPattern हा हॅशटॅग चालवून आदित्य ठाकरेंना सावध केलंय- तुझ पे नजर हैं! असे ट्वीटच्या शिंदे यांनी केले आहे.