Exclusive : मुंबई ‘महापौर’ पुन्हा परिचारिकेच्या भूमिकेत

119 2,400

मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना या रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांचे मनोधैर्य वाढविणे देखील महत्वाचे आहे. आज अनेक परिचारिका, डॉक्टर्स आपल्या जीवाची पर्वा न करता या रुग्णांवर उपचार करत आहेत आणि त्यांची काळजी घेत आहेत. अशा या परिचारिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर पुन्हा आपल्या जुन्या व्यवसायात प्रवेश केला आहे. माजी परिचारिका असल्याने त्या मुंबईतील महापालिका रुग्णालयातील परिचारिकांशी संवाद साधणार आणि नव्या परिचारिकांना काही मोलाचे संदेश देणार आहेत. दोन दिवस मुंबई महापालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये हा संवाद आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी नायर रुग्णालय आणि दुसऱ्या दिवशी सायन रुग्णालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Mumbai Mayor, Kishori Pednekar as Nurse

सोशल डिस्टन्स पाळून या गोष्टी आयोजित करण्यात आलेल्या आहे. या कार्यक्रमासाठी पत्रकारांना प्रवेश नसेल अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलेली आहे.

एक कट्टर आणि दमदार शिवसैनिक असणाऱ्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ८० % समाजकारण आणि 20 % राजकारण हेच शिवसेनेच्या यशाचे रहस्य असल्याचे दाखवून दिले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांची काही खास छायाचित्र यानिमित्ताने वाचकांसाठी

Mumbai Mayor, Kishori Pednekar & Family with CM Uddhav Thackarey & Rashmi Thackarey

Get real time updates directly on you device, subscribe now.