उपमहापौर तुषार हिंगे यांच्याकडून पोस्ट ऑफिस कर्मचारी यांना ‘सुरक्षा किट’ चे वाटप

13

अनेक सरकारी कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत.

आज पासून रूजू झालेल्या चिंचवड येथील पोस्ट ऑफिस येथील अधिकारी, स्टाफ,कर्मचारी यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपमहापौर तुषार रघुनाथ हिंगे यांच्या कडून सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले आहे. सुरक्षा किटमध्ये होमिओपॅथिक औषध,मास्क, सॅनिटायजर या गोष्टींचा समावेश आहे.

“माझ्या कुटुंबाचा भाग असलेले हे पोस्टाचे अनेक अधिकारी,कर्मचारी,स्टाफ प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत आहेत, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात काम करत असताना त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी या करिता हे छोटस पाऊल मी टाकत आहे, असे उपमहापौर तुषार हिंगे यावेळी म्हणाले.” पोस्टाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी यावेळी तुषार हिंगे यांचे आभार मानले.