बाप्पांच्या विसर्जनाला नाशिकमध्ये गालबोट; मूर्ती संकलन करणाऱ्या ट्रकच्या धडकेत एक ठार

21

नाशिक: भक्ती भावाने दहा दिवस पुजा आरती करुन काल गणपती बाप्पाचे मोठ्या आनंदात विसर्जन करण्यात आले. नाशिकमध्ये महापालिकेच्या गणेश मुर्ती संकलित करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे बाप्पांच्या विसर्जनास गालबोट लागले.

गणेश विसर्जनासाठी महापालिकेने ठिकठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण केले होते. पंचवटी आणि रामकुंड परिसरातही अशा तलावांची निर्मिती करण्यात आली होती. पंचवटीतील गोदा घाटाजवळ असणाऱ्या म्हसोबा महाराज पटांगणावर गणेश मूर्तीचे संकलन सुरू होते. यावेळी मूर्ती संकलित करणाऱ्या ट्रकने (एम. एच. 15 8129) सकाळी आठच्या सुमारास एका व्यक्तीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सख्खे भाऊ ठार

दारूचे व्यसन सोडविण्यासाठी गेलेले सख्खे तरुण भाऊ अपघातात ठार झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉइंटजवळ घडली आहे. गोरख लक्ष्मण जाधव (वय 35) सोमनाथ लक्ष्मण जाधव भाऊ (वय 25) अशी मृतांची नावे आहेत. इगतपुरी तालुक्यातील मुरंबीत गोरख जाधव रहायचे. त्यांचा लहान भाऊ सोमनाथला दारूचे व्यसन होते. त्यामुळे गोरख हे सोमनाथ यांना दारूचे व्यसन सोडविण्यासाठी वणी येथे दुचाकीवरून घेऊन गेले होते. वणी येथे औषधोपचार करून ते गावाकडे निघाले. तेव्हा परतीच्या प्रवासात मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉइंटजवळील उड्डाण पुलावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उडविले. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

रानवड शिवारात चारचाकीने उडवले

नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रात्री आठच्या सुमारास रानवडहून पिंपळगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका मोटारसायकलला (एम.एच. 15 जी. एन. 1118) पाठीमागून धडक दिली. त्यात मोटारसायकलवरील आकाश सोमनाथ गिते (वय 24, रा. पालखेड) यांचा जागीच मृत्यू झाला. आकाश यांचे डोके, तोंड, दोन्ही हात व उजव्या पायास गंभीर जखमा झाल्या होत्या. अपघातानंतर वाहनचालकाने

Get real time updates directly on you device, subscribe now.