शिवसेना मंत्री अनिल परबांकडून हायकोर्टात याचिका, किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा

मुंबई: महाविकास आघाडीमधील परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. नाहक बदनामी केल्याप्रकरणी अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा उच्च न्यायालयात दाखल केला आहे.
‘किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन ७२ तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.’
किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन ७२ तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
— Anil Parab (@advanilparab) September 21, 2021
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी 72 तासांमध्ये माफी मागावी नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी 14 सप्टेंबर 2021 रोजी दिला होता. मात्र, या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी माफी न मागितल्याने आता अनिल परब यांनी त्यांच्याविरोधात दावा ठोकला आहे.
किरीट सोमय्या यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपांचं पुराव्यांसह स्पष्टीकरण द्यावं अन्यथा 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकू अशी नोटीस परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना पाठवली होती.