आजपासून मंदिरे उघडली, अहमदनगर मध्ये ‘या’ मंदिरासाठी असणार १४४ कलम लागू, जाणून घ्या

अहमदनगर: आजपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरूवात झाली आहे. घटस्थापनेच्या शुभ मुहुर्तावर राज्यभरातील धार्मिक आणि प्रार्थनास्थळे आजपासून भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र असं असलं तरी राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाची भीती अजूनही कायम आहे. राज्यभर मंदिरं उघडली तरी 6 मंदिरात मात्र कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यातच काही दिवसांपुर्वी जिल्ह्यातील तब्बल 61 गावांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अशातच नवरात्र उत्सव तोंडावर असतांना गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी नवरात्रीच्या संपूर्ण काळात जिल्ह्यातील 6 मंदिर परिसरामध्ये 144 कलम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्या मंदिरासाठी असणार 144 कलम लागू?

1 श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे, ता.पाथर्डी (मोहटा देवी मंदीर), 2 श्री जगदंबा देवी मंदीर, राशीन, ता. कर्जत, 3 रेणूका माता देवी मंदीर, केडगांव ता. अहमदनगर, 4 रेणूका माता देवी मंदीर, एम.आय.डी.सी. अहमदनगर, 5 रेणूका माता देवी मंदीर, भिस्तबाग, पाईपलाईन रोड, अहमदनगर, 6 तुळजा भवानी मंदीर, बुऱ्हाणनगर ता. अहमदनगर

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!