सासरी हुंड्यासाठी छळ; त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

भोसरी: सासरच्या लोकांना ठरल्याप्रमाणे लग्रात १२५ तोळे सोने दिले, त्यानंतर अजून त्यांची मागीण वाढली व्यवसायासाठी त्यांना ८३ लाख रुपये देण्यात आले. इतके पैसे देऊन ते समाधानी झाले नाही, त्यांनी विवाहीत महिलेला त्रास देत अजून पैशाची मागणी करत, या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात पती अखिल विपीन (वय 33), सासू सुधा विपीन (वय 53, दोघे रा. मोशी प्राधिकरण) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या मागणीनुसार फिर्यादी यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात 125 तोळे सोने दिले. परंतु लग्नात पैसे दिले नव्हते. आरोपींना व्यवसाय करण्यासाठी म्हणून नंतर 83 रुपये रोख स्वरूपात फिर्यादी यांनी दिले. त्यानंतरही आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलीला वारंवार पैशांच्या मागणीवरून शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने गुरुवारी (दि. 7) राहत्या घरी आत्महत्या केली. पोलिसांनी आरोपी पती अखिल याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) पाटील तपास करीत आहेत.