पुष्पक एक्सप्रेस दरोडा आणि बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपी गजाआड

कल्याण : पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकून महिलेवरील बलात्कार प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आठ पैकी दोन दरोडेखोरांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. हा दरोडा सुनियोजित नसला तरी आरोपी हे सराईत गुन्हेगार मानसिकतेचे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

८ ऑक्टोबर रोजी रात्री साडे सात वाजता लखनऊ सीएसटी पुष्पक एक्सप्रेसमध्ये डी टू या बोगीत दरोडा टाकण्यात आला. आठ दरोडेखोरांनी 16 प्रवाशांना मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल रोकड लूटली होती. मारहाणीत सहा प्रवासी जखमी झाले. नऊ प्रवाशांचे मोबाईल आणि सहा प्रवाशांची रोकड आणि एका महिलेवर दोन आरोपींनी बलात्कार केला. कसारा स्टेशनच्या आधी आरोपीपैकी एकाने गाडीची साखळी खेचली. तीन आरोपी पळून गेले. उर्वरीत पाच पैकी तीन कसारा स्टेशन आल्यावर उतरले.  उर्वरीत दोन आरोपींना प्रवाशांनी पकडून ठेवले. या दोन आारेपींकडून पोलिसांनी माहिती घेतली आणि तपास सुरु केला.

मध्य रेल्वेचे पोलिस आयुक्त कैसर खालीद, उपायुक्त मनोज पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल रेल्वे पोलिसांचे तीन पथके आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी तपास सुरु केला. या गुन्हयातील सर्व आरोपी अशरद शेख, प्रकाश पारधी, अजरून परदेशी, किशोर सोनवणो, काशीनाथ तेलंग, आकाश शेनोरे, धनंजय भगत आणि राहूल आडोळे या आठही जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!