पुण्यासारख्या शहरात शिवसेनेचाही महापौर असावा अशी पुणेकरांचीच इच्छा- संजय राऊत

पुणे: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणुका लढणार की वेगळी मोट बांधणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

संजय राऊत म्हणाले की, पुणे आणि पिंपरी चिंचवडला महापौर आमचा असेल, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. मात्र, यावेळी बोलताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही उल्लेख केला. तसंच आम्ही जुळवून घेण्याचा प्रयत्न करु, असंही राऊत यावेळी म्हणाले. पुण्यासारख्या शहरात शिवसेनेचाही महापौर असावा अशी पुणेकरांचीच इच्छा असल्याचं सूचक वक्तव्य राऊत यांनी केलंय.

त्याचबरोबर राज्यात अनेक पॅटर्न येतात आणि जातात. पण सध्या महाराष्ट्रात ठाकरे-पवार पॅटर्नचा बोलबाला आहे. हा एक चलनी पॅटर्न आहे. दोन प्रमुख पक्ष, त्यात काँग्रेसची सोबत आली तर काय होऊ शकतं हे सर्वांनी पाहिलं आहे. आम्ही आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्याही मतांचं विभाजन होऊ देणार नाही, असा दावाही राऊत यांनी यावेळी केलाय.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!