महागाईचा भडका: पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा 35 पैशांनी वाढ!

मुंबई: आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडं मोडलं आहे. त्यात दिवाळी तोंडावर आली आहे असे असताना पेट्रोल-डिझेलचा भडका सुरुच आहे. पेट्रोल-डिझेलचे दर रोज नवीन विक्रम करत आहेत. देशांतर्गत तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज पेट्रोलच्या किमतीत 35 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या किमतीत देखील 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण उत्पादन कमी असल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहे. त्याचा परिणाम म्हणून देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच आहे. देशात पेट्रोल शंभरी पार झाले आहे त्यापाठोपाठ आता डिझेल देखील शंभरी पार होताना दिसत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे देशाच्या राजधानीसह प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढले आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात 35 पैशांनी वाढ होऊन एक लिटर पेट्रोल 106.54 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ होत ते 96.27 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलमध्ये 33 पैशांनी वाढ होऊन एक लिटर पेट्रोल 112.44 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर डिझेलच्या दरात 37 पैशांनी वाढ होऊन डिझेलचे दर 103.26 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. अशामध्ये सततच्या महागाईमुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेल शंभरी पार झाले आहे.

Read Also :