नवाब मलिकांच्या या प्रश्नाला समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मेहुणीवर हल्लाबोल केला आहे. समीर वानखेडेंची पत्नी- अभिनेत्री क्रांती रेडकर यांची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर या ड्रग्जच्या व्यवसायात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. याचे उत्तर वानखेडेंनी द्यावे अशी मागणी देखील केली होती.  या सवालावर समीर वानखेडेंनी उत्तर दिलं आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या या ट्विटनंतर आता समीर वानखेडे यांनी देखील नवाब मलिकांना उत्तर दिलं आहे. मलिकांनी केलेल्या ट्विटबद्दल जेव्हा वानखेडे यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, ‘जेव्हा 2008 साली हे प्रकरण घडलं तेव्हा मी सेवेत देखील नव्हतो. मी 2017 साली क्रांती रेडकरशी लग्न केलं आहे. म्हणजेच ड्रग्ज प्रकरणातील केसनंतर तब्बल नऊ वर्षांनी. त्यामुळे माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. ही घटना जुनी आहे मग तरीही माझा या खटल्याशी संबंध कसा?’ असा प्रति सवाल वानखेडे यांनी नवाब मलिक यांना केला आहे.

नवाब मलिक यांचे ट्टिट

समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मलिक यांच्याविरोधात 1.25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. त्यानंतरही नवाब मलिक यांच्याकडून आरोपांची सरबत्ती सुरुच आहे. समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या पुरावा, असं लिहित नवाब मलिक यांनी ट्विटरवर काही कागदपत्रे पुरावे म्हणून सादर केले आहेत.

Read Also :