राऊत इंटरव्हलनंतर बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार; नितेश राणे यांचा शिवसेनेवर घणाघात
मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यातच प्रभाकर साईल यांच्या व्हिडीओनं मोठी खळबळ उडाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊतही आक्रमक झाले आहेत. इंटरव्हलपर्यंत नवाब मलिकांनी सांगितलं, आता इंटरव्हलनंतर मी बोलणार, असं सूचक वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. त्यानंतर नितेश राणे यांनी राऊतांना इशारा दिला आहे.
नितेश राणे म्हणाले, संजय राऊत काल असं बोलले की इंटरव्हलपर्यंत नवाब मलिक आहेत. इंटरव्हलनंतर मी बोलणार. तर त्यांना मी सांगतो की क्लायमेक्स मी करणार, असा सूचक आणि थेट इशाराच नितेश राणे यांनी राऊतांना दिला आहे. प्रभाकर साईल नावाचा व्यक्ती पुढे येतो. तो कोण होता? काय होता? त्याची पार्श्वभूमी काय? गेल्या 10 – 15 दिवसात तो कुणाशी बोलला? या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत.असेही ते म्हणाले.
प्रभाकर साईल जे बोलतोय ते तुम्ही सत्य मानत असाल, तर मग सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सुशांतचा सर्वात जवळचा मित्र गणेश हिवरकर नावाचा व्यक्ती होता. तो वारंवार टीव्हीवर सांगत होता, तो माझ्या घरी आला, त्यावेळी एक आमदार मित्रा माझ्यासोबत होते.
त्याने मला सांगितलं आहे की, सुशांतसिंह आणि दिशा सालियान प्रकरणात नेमकं काय झालं आणि त्याला कसं धमकावलं गेलं. या आघाडी सरकारमधील एक युवा मंत्री कसा त्याला बाळासाहेब ट्ऱॉमा हॉस्पिटलमध्ये भेटायला आला, किती वाजता भेटायला आला आणि तो नेमकं त्याच्याशी काय बोलला? हे सगळं संभाषण त्याने मला आणि माझ्या आमदार मित्राला सांगितलं आहे असे नितेश राणे म्हणाले.
Read Also :
-
काळाने घातला घात, विठू माऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांचा भीषण अपघात; एकाच…
-
राज्य सरकाचा मोठा निर्यण: लोकल प्रवासाची नागरिकांना मुभा, ‘या’ नियमांचे करावे…
-
महाराष्ट्र सरकार माझ्या पतीच्या विरोधात काम करत आहे; क्रांती रेडकरचा मोठा खुलासा
-
जनाब संजय राऊत, तुम्हाला मलिकांच्या नजरेतूनच हिंदूस्थान पाहायचाय; चित्रा वाघ यांचा…
-
2500 नागरिकांचे लसीकरण, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार, लहू बालवडकर यांच्या महा…