‘चुकीला माफी नाही’ अनिल देशमुखांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर 13 तासाच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली आहे. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. राज्याच्या राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या अटकेवर खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे. ईडी कायद्याप्रमाणे चौकशी करत आहेत. चौकशीनंतर त्यांना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. चुकीला माफी नाही, असं देशमुखांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले.
मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. त्याअगोदर त्यांची 13 तास कसून चौकशी करण्यात आली. मात्र चौकशीवेळी ते ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर सेक्शन 19 पीएमएलए अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आज अगदी सकाळी सकाळी पुण्यात चंद्रकांत पाटील यांना अनिल देशमुख यांच्या अटकेवर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी खोचक प्रतिक्रिया देताना चुकीला माफी नाही, असं म्हटलं.
कुणाचाही कार्यकर्ता असु दे. कुणाचीही चुक माफ केली जाणार नाही, असं नरेंद्र मोदींनी 2014 ला सांगितलं होतं. देशातून राज्या-राज्यांतून भ्रष्टाचाराला हद्दपार करायचंय. देशमुखांच्या बाबतीत शेवटी हे व्हायच तेच झालं. ईडीने अनेक वेळा समन्स देऊनही ते हजर राहिले नाही. ईडीने त्यांना पुरासा वेळ दिला. आता ईडीने अटकेची कारवाई केलीय. ईडी त्यांच्या पद्धतीने चौकशी करत आहे. शेवटी चुकीला माफी नाही’
Read Also :