गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका?, सरकारनं विशेष पोलीस संरक्षण द्यावी, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

12

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी या संदर्भातील पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पाठवले आहे. गोपीचंद पडळकर हे सध्या मुंबईत आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली आणि सोलापूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केल्याचं समजतं.

देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांच्या सुरक्षेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका असल्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्रात केला आहे.बहुजनांच्या बाजूनं उभ राहिल्यान यातून दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्यानं हल्ला करत आहेत. लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेनं दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विरोधक असो वा सत्ताधारी ज्याचा जिवास धोका त्याला संरक्षण दिल पाहिजे आणि म्हणूनच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या जिवास काही बर वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जबाबदारी असेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. गोपीचंद पडळकरांना तात्काळ सुरक्षा द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आलीय.

Get real time updates directly on you device, subscribe now.