मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणारा पोलिसांच्या ताब्यात

7

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्या बद्दल ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाजपचा पदाधिकारी जितेन गजारीया याला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने  ताब्यात घेतलं आहे. जितेन गजारीया याने रश्मी ठाकरे यांच्या सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दलही ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्यं केलं होतं.

जितेन गजारिया हे भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्विट करताना आक्षेपार्ह भाषेचा उपयोग केला होता. आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी जितेन गजारिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबतही आक्षेपार्ह लिखान केलं होतं. त्यामुळे त्यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने नोटीस बजावली होती.

त्यानंतर आता जितेन गजारिया यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे. हे आक्षेपार्ह ट्विट त्यांनी का केलं आणि त्यामागे त्यांचा काय उद्देश होता याबाबत आता पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. तसेच भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया प्रभारींनी अशाप्रकारे आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाला राज्यात सत्ता मिळत नसल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य सुरू असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.