पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीच तडजोड नको, पंजाब दौऱ्यातील त्या घटनेची चौकशी व्हावी; उद्धव ठाकरेंची मागणी

5

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंजाब घटनेबाबत एक ट्विट केलं आहे. सुरक्षेतील त्रुटींमुळे देशानं दोन पंतप्रधान गमावले आहेत, म्हणून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट केली आहे. “पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये. पंजाब दौऱ्यात मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीपंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींमुळे एका उड्डाणपुलावर १५ ते २० मिनिटं अडकून पडले होते. यावरुन आता जोरदार राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे. भाजपानं पंजाब काँग्रेसवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. तर काँग्रेसनंही मोदींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन वेगवेगळे आरोप केले आहेत. यातच आता संजय राऊत यांनीही उडी घेतली. पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरेक्षे बाबत कोणतीच तडजोड होता कामा नये.पंजाब दौऱ्यात मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

मोदींच्या पंजाब दौऱ्यावेळी काय झालं होतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौऱ्यावर होते. मोदींच्या दौऱ्याला पंजाब पोलिसांनी ग्रीन सिग्नलही दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा बुधवारी फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी नाकेबंदी केल्यामुळे उड्डाणपुलावर अडकून पडला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदींची यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता.

पंतप्रधान मोदी पंजाबमधील जनतेला संबोधित करणार होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील या रॅलीत सहभागी होणार होते. गृहमंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटलं की, “बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे दाखल झाले, तेथून ते हुसैनवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु, पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे पीएम मोदींना सुमारे 20 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली होती.”

Get real time updates directly on you device, subscribe now.