ओमिक्रॉन व्हेरियंटचा विकी-कतरिनाच्या लग्नाला फटका, घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मुंबई: बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिझन जोमाने सुरु असताना दुसरीकडे जगात मात्र कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूने थैमान घातले आहे. अशातच बॉलिवूड सेलिब्रिटी देखील ओमिक्रॉन विषाणूपासून दूर राहण्यासाठी स्पेशल प्लॉनिंग करतायत. दरम्यान अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफ देखील ९ डिसेंबरला जोधपूरमध्ये ग्रँड वेडिंगची तयारी करत आहेत. दोघांच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांची यादीही समोर आली.

मात्र ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे त्यांच्या लग्नाला येणाऱ्या काही पाहुण्यांची नावे या यादीतून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या यादीमध्ये सलमान-शाहरुख या जवळच्याच व्यक्तींची नावे वगळले आल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे विक्की कौशल-कतरीनाच्या लग्नात ओमीक्रॉन विषाणू विघ्न ठरत असल्याचे म्हटले जातेय.

मात्र कतरिना आणि विकी लग्नात ओमिक्रॉनचा शिरकाव होऊ नये यासाठी खास काळजी घेत आहेत. त्यामुळे दोघांच्या वेडिंग प्लानर्सने गेस्टची संख्या कमी करण्याचा प्लॉन आखला आहे. विकी-कतरिनाने वेडिंग प्लानर्ससोबत एक ऑनलाईन मिटिंग घेतल्याची देखील चर्चा आहे. यात जगभरात वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन विषाणूवर चर्चा झाली.

सूत्रांच्या माहितीनुसार, कतरिना आणि विकीला ओमिक्रॉन विषाणूबद्दल कोणताही धोका पत्करायचा नाही परंतु गेस्ट लिस्टची यादी छोटी करणं हे देखील त्यांना अवघड जातेय. या जोडप्याने लग्नाला त्यांच्या कोस्टार, डायरेक्टर आणि प्रोड्यूसर्स यांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र यावर ते पुन्हा निर्णय घेत आहे. कतरिनाच्या बाजूने काही पाहुणे परदेशातून येणार आहेत. मात्र नव्या ट्रॅव्हल्स गाईडलाईन्सनुसार यात बदल होऊ शकतो.