पीएम शेतकरी सन्मान निधी योजना: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना मिळणार पैसे

100

मुंबई: केंद्र सरकारकडून प्राप्त होणाऱ्या पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात न आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकार शेतकऱ्यांना दहावा हप्ता देणार आहे. 1 जानेवारी 2022 रोजी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जाणार आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या हेतूने पीएम किसान सन्मान निधी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात प्रतिवर्षी चार महिन्यांच्या अंतराने दोन हजार रुपयांचे तीन हप्ते जमा केले जात आहेत. १ जानेवारी २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी उत्पादक संघटनांना इक्विटी अनुदान देखील जारी करणार आहेत. तुम्ही या कार्यक्रमाशी दूरदर्शन किंवा pmindiawebcast.nic.in द्वारे कनेक्ट होऊ शकता. असा एक मेसेज शेतकऱ्यांना पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल तरच पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना 10 व्या हप्त्याचे लाभ मिळणार आहेत. तसेच, या योजनेत ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांना अद्याप 9 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात 2 हप्त्यांचे पैसे एकत्र येतील म्हणजेच त्यांच्या खात्यात 4 हजार रुपये ट्रान्सफर होतील. पण ही सुविधा केवळ त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी 31 ऑक्टोबरपूर्वी नोंदणी केलीय.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.