विरोधकांच्या वैयक्तीक टीकेला मी शांततेत घेतोय, तुम्ही निवडणूकीच्या तयारीला लागा’ उध्दव ठाकरेंचा शिवसैनीकांना सल्ला

20

मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे. मुंबईतील जवळपास २२७ शिवसेना शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक आमदार आणि खासदारांसोबत शिवसेना पक्षप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत माझ्यावर होणाऱ्या वैयक्तीक टीकेला मी संयमाने घेत आहे. ज्यांना करुन दाखवायचे ती मी त्याच वेळी करुन दाखवत असतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य केले. तसेच, तुम्ही आता निवडणुकीच्या कामाला लागा, असेही उद्धव ठाकरे शिवसैनिकांना दिले.

“मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका होत असून या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं त्याला मी त्याच वेळेला करून दाखवतो. आता येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागा. मी माझ्या कामानेच माझी पोचपावती देतो,” असं उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाही आहेत. हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री अनुपस्थित असल्याने विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. मुंबई पालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीत ते बोलत होते. तसेट मुख्यमंत्री पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागातील झालेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा असा आदेश दिला. मुंबई महापालिकेनं महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाच्या सहकार्यानं नुकताच मुंबईतील पाचशे स्क्वेअर फुटाचा मालमत्ता कराचा निर्णय आपण घेतलाय तो जनतेपर्यंत पोहोचवा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. विकास कामाची पोहोचपावती मिळायला हवी, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

दरम्यान, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी होर्डिंग बॅनर लावण्यापेक्षा जनतेपर्यंत पोहोचणं गरजेच आहे, असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. मोठ-मोठे बॅनर लावू नका ते जनतेला आवडत नाहीत, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साडेदहा वाजता सुरू झालेली बैठक साडेअकराला संपली.

Get real time updates directly on you device, subscribe now.