हा अर्थसंकल्प गरिबांच , कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं कल्याण करणारा आहे – नितीन गडकरी

6
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. सीतारमन यांनी आज अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. अनेक दिलासादायक गोष्टी अर्थसंकल्पात नामूद करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पावर केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या अर्थसंकल्पात सर्वाधिक प्राधान्य पायाभूत सुविधांना देण्यात आले असून अर्थसंकल्प खूप वाढला असल्याचे  मत गडकरी यांनी व्यक्त  केले आहे.

नितीन गडकरी यांनी म्हटले कि, निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे . आमचा अर्थसंकल्प खूप वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात भारतात जागतिक दर्जाचे रस्ते तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू. ग्रीन एनर्जी , ग्रीन पॉवर असा सर्वच ठिकाणी जो ग्रीन उल्लेख झाला , हे पर्यावरण संरक्षण करण्यासाठी महत्वाचे पाऊल आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
गडकरी यांनी पुढे म्हटले आहे कि, सामान्य माणसाच्या आयुष्यात हवा – पाणी प्रदूषणाचे प्रश्न गंभीर आहेत. पर्यावरण पूरक धोरणामुळे या प्रदूषणात मोठी सुधारणा होईल. आधी मध्यमवर्गाविषयी विचार केला जात नव्हता. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. हा अर्थसंकल्प गरिबांच , कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं कल्याण करणारा आहे , असे गडकरी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. हा भारताच्या अर्थव्यवस्थेला जगात सुपर इकॉनॉमी पॉवर करण्यासाठी उपयोगी येईल , असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.