नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतला स्वच्छ भारत साकारण्यासाठी एक सोसायटी, एक गाव मानून प्रयत्न करावे, यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

19
पुणे : पुणे महापालिका सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर ओल्या कचऱ्यातून साकारलेल्या गार्डनचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्घाटन केलं. स्वच्छ भारताच्या दिशेने आपण वेगाने वाटचाल करत आहोत. पुणे शहराची या स्पर्धेतली कामगिरी अधिकाधिक उंचावण्याची गरज असल्याचं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले. पुणे महानगरपालिकेचे सिंहगड क्षेत्रीय कार्यालय, साई जनसेवा प्रतिष्ठान  आणि ग्रीन व्हिजन मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ओल्या कचऱ्यापासून हे टेरेस गार्डन तयार करण्यात आले आहे.
आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतला स्वच्छ भारत साकारण्यासाठी एक सोसायटी, एक गाव मानून प्रयत्न करावे, यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले. वेगवेगळ्या पद्धतीने कचऱ्याचे निर्मुलन करत स्वच्छ भारताच्या दिशेने आपण वेगाने वाटचाल करत आहे. या स्पर्धेतील पुणे शहराची कामगिरी अधिकाधिक उंचाविण्याची गरज आहे. एक सोसायटी म्हणजे एक गाव असे मानून विभागवार स्वच्छतेसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. ओला आणि सुका कचरा जिरविण्यासाठीची पुस्तिका नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि कचऱ्याचा उत्तम उपयोग होऊ शकतो हे त्यांना पटवून द्यावे, असे आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी केले.

महानगरपालिकांच्या सर्व  इमारतींवर असे प्रकल्प सुरू करावे आणि लोकप्रतिनिधींदेखील अशा अभिनव उपक्रमांसाठी पुढाकार घ्यावा, असेही चंद्रकांत पाटील याची म्हटले. पुणे महानगरपालिकेने राबविलेला उपक्रम स्तुत्य असून याद्वारे नागरिकांनाही पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचे प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी देखील पाटील यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास महापालिका आयुक्त विक्रम कुमार, आ. भीमराव तापकीर, माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडेंसह अधिकारी उपस्थित होते. कचरा संकलन वाहनांचं लोकार्पणही या वेळी झालं.

Get real time updates directly on you device, subscribe now.