राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण…. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

26

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीचा आजचा तिसरा दिवस. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला.  आज ठाकरे गटाकडून प्रतिवाद झाला. आज या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार कि सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार ? हे आता  लवकरच स्पष्ट होणार आहे.

आज दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे  कौल यांनी युक्तिवाद केल्यानंतर  ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रतिवाद केला. यावेळी सिब्बल यांनी म्हटले कि, दहाव्या सूचीचा वापर सरकार पाडण्यासाठी होऊ नये. हे प्रकरण केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून भविष्यातील घडामोडींच्या दृष्टीनेही महत्वाचे आहे. भविष्यात १० व्या अनुसूचीच्या आधारे देशातील सरकार पाडली जाऊ शकतात. हे लोकशाहीला परवडणारे नाही, असे त्यांनी म्हटले.
सिब्बल यांनी म्हटले कि, आमदार एखाद्या पक्षात विलीन झाले तरी मूळ पक्ष तसाच राहतो. मुळात सुनिल प्रभू यांनी जारी केलेल्या व्हिपचे आमदारांकडून उल्लंघन झाले. त्यांनी भाजप उमेदवाराला मतदान केले, असा प्रतिवाद त्यांनी केला.
आज सुनावणी पुर्नं झाली असून न्हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार कि सात न्यायधीशांच्या घटनापीठासमोर जाणार ? याबाबत निर्णय राखूनु ठेवण्यात आला आहे. लवकरच याबाबत स्पष्टता होईल असे म्हटले जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.