व्हीप पाळा , नाहीतर कारवाई होईल – शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावलेंचा ठाकरे गटाला इशारा
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर आता शिवसेना (शिंदे गट) जोमाने तयारीला लागला आहे. शिवसेनेने म्हणजेच (शिंदे गटाने) अधिवेशनाची तयारी सुरु केली आहे. आमदारांनी विधिमंडळातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला. यांनतर बोलताना प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांबाबत मोठं विधान केल आहे. अधिवेशनातील उपस्थितीबाबत लवकरच व्हीप जारी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ठ केले.
भारत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले कि, अधिवेशनाबाबत जो व्हीप जारी करणार आहे हा विष सर्वांनाच लागू होतो. त्यातून कोणीही सुटणार नाही. शिवसेना या नावावर आणि चिन्ह यावर जे कोणी निवडून आले आहेत. मग ते ठाकरे असो किंवा शिंदे गट, सर्वांनाच हेव्हिप्लागु होणार आहे. आम्ही चुकीचं काही करणार नाही, असे भरत गोगावले यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या सर्व ५६ आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावं असे वक्तव्य आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील केले आहे. याबाबत प्रतोद भरत गोगावले सूचना करतीलच. ५६ आमदारांनी व्हिपच उल्लंघन करू नये. जे उपस्थित राहणार नाही त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल. असेही प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
याबाबत उद्धवठाकरे यांनी प्रतिकिया दिली आहे. त्यांनी म्हटले कि, आमदार अपात्र होऊ शकत नाही. कारण ,निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला मान्यता दिली आहे. दोन गट आहेत, हे मान्य केले आहे. त्यानुसार आम्हाला नाव आणि चिन्ह वेगळं दिल आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.