गॅस दरवाढ व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याबाबत आज सभागृहात आवाज उठवण्यात येईल – जयंत पाटील

5
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३५० रुपये दरवाढ झाली आहे. हॉटेलमध्ये चहा घ्यायला गेलो तरी पैसे अधिक द्यावे लागतील. मध्यवर्गीय महिला, खेड्यातील जनता, आदिवासी, गोरगरिबांसाठी ५० रुपये वाढ खूप होते. या दरवाढीचा निषेध महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
तसेच एमएसईबीच्या वीज जोडण्या आहेत ते तोडण्याचे काम अव्याहतपणाने हे सरकार करत आहे. अनेक शेतकऱ्यांची वीज तोडण्यात आली याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या दोन्ही गोष्टींवर आवाज उठवण्याचे काम महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात येत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
गॅस दरवाढ व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याबाबत आज सभागृहात आवाज उठवण्यात येईल. देशात जी महागाई वाढत आहे त्याबाबत सभागृहात भूमिका मांडणार आहोत. त्याचबरोबर कांदा विक्रीसाठी राज्य सरकार समिती नेमणार आहे. मागील १४ दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. समिती नेमून सर्व कांदा विकल्यानंतर सरकार निर्णय देणार हे आम्हाला मान्य नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निश्चितच सभागृहात विरोधी पक्षाकडून आवाज उठवण्यात येईल, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.