क्रिएटिव्ह फाऊंडेशन आणि एनॅबलर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिव्यांगांना व्हीलचेअर प्रदान

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन कि बात या रेडिओ कार्यक्रमाचा शुभारंभ पार पडला. यानिमित्ताने आज पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज क्रिएटिव्ह फाऊंडेशन आणि एनॅबलर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिव्यांगांना व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणले कि, भारत विकास संस्था ही पुण्यात दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव निर्माण करणारी संस्था कार्यरत आहे. दिव्यांगांना कृत्रिम अवयव मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यासाठी पुण्यात प्रकल्प उभारण्याचा त्यांचा मानस आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी शासन सकारात्मक असून या प्रकल्पामुळे संपूर्ण जगभरात आपण कृत्रिम अवयव उपलब्ध करुन देऊ शकू, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास संदीप खर्डेकर, मंजुश्री खर्डेकर, उद्योजक संजीव अरोरा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.