स्व. गिरीशजी बापट यांनी दाखवलेली दिशा ही सदैव आम्हा सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरणार आहे  – चंद्रकांत पाटील

पुणे : पुण्यनगरीचे लोकनेते आणि सर्वांचे मार्गदर्शक गिरीशजी बापट यांना रविवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी, खासदार रामदास आठवले यांच्या सह प्रत्येकांनी गिरीशजी यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात गिरीशजी बापट यांच्या मार्गदर्शनाने झाली. बापट साहेबांचे जाणे हे सर्वांनाच चटका लावून जाणारे असले, तरी त्यांनी दाखवलेली दिशा ही सदैव आम्हा सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरणार आहे, असे पाटील म्हणाले. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता.

गिरीश बापट यांच्या आठवणींना उजाळा देताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, गिरीशजी माणसांची काळजी घेणारे असे प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. . लोकांना खाऊ पिऊ घालणं, ते घाऊ – पिऊ घालून झाल्यानंतर लोकांचा समाधानकारक चेहरा पाहून त्यांना समाधान वाटायचं. मला राजकीय जीवनामध्ये प्रस्थापित करण्यासाठी गिरीशजींनी घेतलेली मेहनत हि अतिशय महत्वाची आहे. एखादा कार्यकर्ता, एखादा नेता हा राजकारणामध्ये दुसऱ्याला मोठा करण्यामध्ये आनंद मानतो. गिरीशजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये इतरांना मोठा करण्यात आनंद मानला.

पाटील पुढे म्हणाले कि, मी माझ्या गावी असताना मला एकदा पुणे पदवीधर निवडणुकीसाठी गिरीशजींनी बोलवून घेतलं. ते म्हणाले कि, आपल्या पक्षात पहिल्यांदा लढलो वगैरे असे काही नसते. आपण सगळेजण मिळून निवडणूक लढायची असते. त्यांनी मला आत्मविश्वास दाखवला. त्यांना मी म्हणालो कि तुम्ही सोबत असाल तरच मी निवडणूक लढायला तयार आहे. त्यावेळी निवडणुकीच्या तयारीसाठी मला असं सांगण्यात आलं कि आधी तुमचा लूक बदला . त्यावेळी मी चष्मा बदलावा म्हटलं. आणि डोळे तपासणीसाठी गेलो असता त्यावेळी ट्युमर निघाला. त्यावेळी गिरीशजी माझ्यासोबत होते त्यांनी माझी बँगलोरला जायची व्यवस्था केली. ऑपरेशन करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी मला खूपच काळजी घ्यायला सांगितली. त्यावेळी गिरीशजींनी खूप सपोर्ट केला.

गिरीशजींना स्वर्गीय असं म्हणणं खूपच अवघड जात आहे. त्यावेळी त्यांची साथ मिळाली म्हणून मी निवडणूक जिंकलो. त्यानंतर २०१४ सालची निवडणूक मला लढायला लावली. सगळया वेळेला आपल्या सगळ्या अडचणींमध्ये बूस्ट करायचं काम गिरीशजींनी केले. एकमेकांचा आदर केला पाहिजे, एकमेकांना मोठं करण्यात आनंद मानला पाहिजे, हे सगळं बापट साहेबांनी केले, असे पाटील म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!