कोल्हापूर येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत एकहाती सत्ता आलेल्या महादेवराव महाडिक यांची चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट

कोल्हापूर : नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवणुकीत महादेवराव महाडिक यांचा दणदणीत विजय आला. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत छत्रपती राजर्षी शाहू सहकार पॅनलचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाल्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक शुक्रवारी कोल्हापूर येथे त्यांची भेट घेऊन सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, कोल्हापूर येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत यंदाही माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सत्ता कायम राखत विजयाचा गुलाल उधळला. या निवडणुकीत महादेवराव महाडिक यांनी 21/0 असा दणदणीत विजय संपादन केला. त्याबद्दल माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांचे खूप खूप अभिनंदन केले तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा, असे पाटील यांनी म्हटले.
राजाराम कारखान्याच्या निवडणुकीची गेल्या महिनाभरापासून कोल्हापुरात तयारी सुरु होती. २१ जागांची लढत होती. २१ पैकी २१ जागांवर महाडिक गटाच्या छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीला यश प्राप्त झाले. महाडिक यांच्या विरोधात सतेज पाटील यांच्या राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडी गटाचा पराभव झाला. महाडिक यांच्याकडे एकहाती सत्ता आली.