G २० परिषदेच्या चौथ्या शिक्षण कार्य गटाचे चर्चासत्र १९ ते २१ जून दरम्यान पुण्यात, सर्वांनी एकत्रितरित्या ही परिषद यशस्वी करुया चंद्रकांत पाटलांचे शिक्षण संस्थांना आवाहन

27

पुणे : पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी जी-20 परिषदेच्या अनुषंगाने आज पुण्यातील विविध शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे संचालक तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना पाटील यांनी पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. त्यामुळे लोकसहभागातून ही परिषद यशस्वी करायची असल्यामुळे सर्वांनी एकत्रितरित्या ही परिषद यशस्वी करुया, असे आवाहन केले.‌

यावेळी उपस्थित शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी परिषदेच्या यशस्वीततेसाठी आपापल्या सूचना यावेळी मांडल्या. या परिषदेच्या चौथ्या शिक्षण कार्य गटाचे चर्चासत्र १९ ते २१ जून दरम्यान पुण्यात होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.