‘रोटरी रोट्रॅक्ट यूथ फेस्टिव्हल’च्या माध्यमातून युवकांना नव्या संधींची क्षितिजे खुली – मंत्री चंद्रकांत पाटील

20

पुणे : रोटरी क्लबच्या वतीने आयोजित ‘रोटरी रोट्रॅक्ट यूथ फेस्टिव्हल’ हा युवकांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासोबतच त्यांच्यातील नेतृत्वक्षमता, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव अधिक समृद्ध करणारा महोत्सव आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पुणे येथे रोटरी क्लबच्या वतीने आयोजित या युवा महोत्सवाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, अशा उपक्रमांतून युवकांना आपल्या क्षमता सिद्ध करण्याची आणि नव्या संधींची क्षितिजे खुली करण्याची मोठी संधी मिळते. या महोत्सवात उत्साहाने सहभागी झालेल्या सर्व युवा मित्रांचे कौतुक करत ना. पाटील यांनी त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या उद्घाटन सोहळ्यास रोटरीचे जिल्हा संचालक संतोष परदेशी, नितीन ढमाले, प्रा. डॉ. करिश्मा आवरी, दीपक शिकारपूर, मानसी ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.