केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न

9

पुणे : केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांची राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त बैठक पार पडली.

या बैठकीत आगामी दौऱ्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दौरा यशस्वी, भव्य आणि सुव्यवस्थितरीत्या पार पडावा, यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तसेच दौऱ्याच्या अनुषंगाने विविध जबाबदाऱ्यांबाबत पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा व संवाद साधण्यात आला.

या बैठकीस भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पुणे ग्रामीणचे अध्यक्ष प्रदीप कंद, शेखर वडणे यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमितभाई शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी पक्षाच्या तिन्ही संघटनात्मक घटकांकडून व्यापक पूर्वतयारी करण्यात येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.